पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांचा सुधारित जिल्हा दौरा
बुलढाणा,दि. 13 (जिमाका): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री ना. मकरंद पाटील हे गुरूवार दि. 13 ते 15 ऑगस्ट 2026 रोजी तिन दिवशीय बुलढाणा
दौऱ्यावर येत आहे. दौऱ्यादरम्यान पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयाचा आढावा,
पुरस्कार सोहळा, विविध विकास कामाचे लोकार्पण तसेच स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय ध्वजारोहण
कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.
त्यांच्या
दौरा कार्यक्रमानुसार गुरूवार दि. 13 ऑगस्ट रोजी मुंबई येथून बुलढाणा येथे आगमन व शासकीय
विश्रामगृह बुलढाणा येथे राखीव.
शुक्रवार
दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अभ्यांगतांसाठी राखीव. दुपारी 12 वाजता गुंतवणूक
परिषद बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता जिल्हा परिषद येथे सी.ई.ओ. संग्राम अभियान पुरस्कार
सोहळाला उपस्थिती. दुपारी 2 वाजता मौजे सागवण ता. बुलढाणा येथे विविध विकास कामांचे
भुमीपूजन व लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात
विविध विषयाच्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता मोताळा येथील स्व. मोबीन
अहेमद, माजी जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल यांचे निवासस्थानी सांत्वनपर भेट. रात्री
8 वाजता शासकीय विश्रामगृह बुलढाणा येथे नगरपरिषद, मोताळा नगरसेवक व पदाधिकारी यांचे
सोबत बैठक.
शनिवार
दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त
शासकीय ध्वजारोहण कार्याक्रमाला उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय
येथे जिल्हास्तरिय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा. दुपारी 1 वाजता मौजे मासरुळ,
ता. बुलढाणा येथील विकास कामांचे लोकार्पण व कार्यकर्ता मेळावा. दुपारी 3 वाजता सातगाव
म्हसला ता. बुलढाणा येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण. सायंकाळी 4 वाजता मौजे अमडापूर
ता. चिखली येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व संवाद मेळावा. त्यानंतर साईनुसार साताराकडे
प्रयाण करतील.
00000
Comments
Post a Comment