महाडिबीटी अर्ज नोंदणीबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मार्गदर्शन

 



 

बुलढाणा, दि. 11 (जिमाका) : अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महाडिबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याबाबत सामाजिक न्याय भवन, बुलढाणा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील 190 महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित कर्मचारी यांना अर्ज नोंदणी प्रक्रियाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

महाडिबीटी 2.0 प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा ६ जुलै २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संस्था व महाविद्यालयांच्या प्राचार्य तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे १९० महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.

 

कार्यशाळेत महाडिबीटी 2.0 या नवीन प्रणालीवर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची १०० टक्के नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ व त्यापूर्वीचे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश देण्यात आले.

 

महाडिबीटी 2.0 प्रणालीचा वापर करताना विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना येणाऱ्या विविध अडचणींवरही कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. अर्ज नोंदणी, प्रक्रिया पूर्ण करणे आणि प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. समाज कल्याण कार्यालयातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गीता केदार, वरिष्ठ लिपिक पी. के. बावणकर आणि संगणक ऑपरेटर सागर डापके यांनी कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यालयातील इतर कर्मचारीही कार्यशाळेस उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या