जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १७ ऑगस्ट रोजी

 


बुलढाणा दि. 13 (जिमाका): समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांची शासकीय यंत्रणेमार्फत सोडवणूक करण्यासाठी तसेच पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यानुसार बुलढाणा जिल्ह्यात सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात होणार आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांनी आपल्या तक्रारी किंवा निवेदन उपजिल्हाधिकारी यांना उद्देशून विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये सादर करावे. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असणे आवश्यक असून, संबंधित महिलेने स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक आहे. विहित नमुन्यात नसलेले अर्ज, न्यायप्रविष्ट प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक प्रकरणे तसेच वैयक्तिक स्वरूपाचे नसलेले तक्रार अथवा निवेदन स्वीकारले जाणार नाहीत.

शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर, तर चौथ्या सोमवारी तालुकास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. समस्याग्रस्त व पीडित महिलांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या