नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणावरील हरकती व सुचनांवर १५ व १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी Ø जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी

 

बुलढाणा, दि. 9 (जिमाका) :  जिल्ह्यातील ११ नगरपरिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले असून या आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सुचनांवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ व १६ ऑक्टोबर रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाने दिली आहे.

जिल्हा नगरविकास प्रशासनाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या सुनावण्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात येथे पार पडणार आहेत. त्यानुसार १५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा, सिंदखेड राजा, मेहकर, शेगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या नगरपरिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सुचनांवर सकाळी ११ ते दुपारी  २.३० वाजेदरम्यान सुनावणी  आयोजित करण्यात आली आहे. तसेच १६ ऑक्टोबर रोजी चिखली, लोणार, देऊळगाव राजा, खामगाव आणि नांदुरा या नगरपरिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत प्राप्त हरकती व सुचनांवर सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान सुनावणी घेण्यात येणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या