‘महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी; निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी

 ‘महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;

निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी

 

बुलडाणा, दि. 17 (जिमाका):  राज्यातील युवा फुटबॉलपटूंना करिअर घडविण्याची आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी महादेवा ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत 13 वर्षांखालील मुले व मुलींसाठी फुटबॉल निवड चाचण्या आयोजित करण्यात आली आहे. या चाचण्यांमधून निवड होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

 

महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून राज्यभरातील 13 वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय फुटबॉल निवड चाचण्या आयोजित करण्यात येणार आहेत. या चाचण्यांमधून निवड होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळणार आहे.

 

या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा फुटबॉल निवड चाचणी दि. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता सहकार विद्या मंदिर, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीत 1 जानेवारी 2012 ते 31 डिसेंबर 2013 दरम्यान जन्मलेल्या मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात. सहभागी खेळाडूंनी चाचणीच्या दिवशी आधारकार्ड व जन्मप्रमाणपत्राची सत्यप्रत सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच गुगल नोंदणी लिंकद्वारे पूर्वनोंदणी पूर्ण केलेली असावी. संबंधित निवड चाचणीबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा किंवा जिल्हा फुटबॉल संघटना, बुलढाणा यांच्याशी संपर्क साधावा.

 

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाळांनी आणि विद्यार्थी खेळाडूंनी या जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि. एस. महानकर यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या