लोकशाही दिन 6 ऑक्टोबरला
बुलढाणा, दि. ३ (जिमाका)
: दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित
करण्यात येतो. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 6 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या
कार्यालयात घेण्यात येणार आहे.
लोकशाही
दिनासाठी तक्रारदारांनी उपस्थित राहावे, उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारी रजिस्टर
पोस्टाने लोकशाही दिनाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचतील अशाप्रकारे पाठवावेत, असे
आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment