सैनिक कल्याण विभागात लिपिक टंकलेखक पदांची भरती; माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविले

 


 

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : सैनिक कल्याण विभाग व त्याच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक(गट-क) या एकूण 72 पदांच्या भरतीसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

एकूण पदांपैकी एक पद हे अंपग संवर्गासाठी राखीव असून, किमान 40 टक्के अंपगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदाऱ्या लक्षात घेऊन गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरती केली जाणार आहे. सदर भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन (T.C.S-ION) यांच्या माध्यमातून पार पडणार असून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

 

पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रिर्सोसेस टॅब-रिक्रूटमेंट टॅब या पर्यायामधून सादर करावेत. अर्ज प्रक्रिया दि. 14 ऑक्टोंबरपासून सुरु झाली असून अंतिम मुदत दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर वेबलिंक बंद होईल, यांची नोंद घ्यावी, असे प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या