ग्रंथभेट योजनेत निवडलेले 1388 ग्रंथ अवलोकनासाठी खुली हरकती व आक्षेपांसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि राज्य
शासनाच्या संयुक्त निधीतून 50व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत 1388 ग्रंथांची यादी ग्रंथालय
संचालनालयाने जाहीर केली आहे.
या यादीमध्ये
मराठी 749, हिंदी 297 आणि इंग्रजी 342 ग्रंथांचा समावेश आहे. सदर यादी संचालनालयाच्या
संकेतस्थळावर 26 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात
आली आहे.
ग्रंथांबाबत
सूचना वा हरकती असल्यास 15 ऑक्टोबरपर्यंत लेखी स्वरूपात पाठविण्याचे आवाहन करण्यात
आले असून, मुदतीनंतर प्राप्त सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे प्र. ग्रंथालय संचालक
अशोक गाडेकर यांनी स्पष्ट केले आहे.
00000
Comments
Post a Comment