सेसफंड योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले
सेसफंड
योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले
बुलढाणा, दि. 14 (जिमाका)
: जिल्हा परिषद
सेसफंड योजनेअंतर्गत सन 2025-26 मध्ये थेट लाभ हस्तांतरण योजनेतुन 75 टक्के अनुदानावर 5 एचपी मोटरपंप संच, पॉवर ऑपरेटेड
स्प्रेअर्स, बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर्स, मानवचलीत स्पायरल सीड सेपरेटर, विद्युत चलीत
चाफ कटर, मानवचलीत टोकनयंत्र (डिबलर) साहीत्य पुरविणे
प्रस्तावीत आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडून अर्ज
मागविण्यात आले आहे. अधिक माहिती करीता संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमधील कृषि
विभागात कृषि अधिकारी (सामान्य) तसेच विस्तार अधिकारी (कृषि) यांचेकडे संपर्क साधावा.
तसेच योजनेअंतर्गत विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह
गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे
दि. 30 ऑक्टोंबर 2025 पर्यत सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषद कृषि विकास
अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment