भारतीय डाक विभागाची दिवाळी विशेष पार्सल सेवा
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : भारतीय डाक विभागाने परदेशात राहणाऱ्या आपल्या स्वकीयांसाठी
दिवाळी फराळ आणि भेटवस्तू पाठविण्यासाठी विशेष पार्सल सेवा सुरू केली आहे.
या सेवेमध्ये एअर पार्सल आणि स्पीड पोस्ट पार्सलच्या
माध्यमातून जगभरातील अनेक देशांपर्यंत फराळ पाठविता येणार आहे. बुलढाणा व खामगाव हेड
पोस्ट ऑफिसमध्ये पार्सल पॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विश्वासार्ह,
सुरक्षित आणि वाजवी दरात उपलब्ध असलेल्या या सेवांचा लाभ घ्यावा, असे बुलढाणा विभागाचे
डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
00000
Comments
Post a Comment