जागतिक कौशल्य स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, दि. 6 (जिमाका): जगातील
सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जागतिक
कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. सन २०२६ ची ही स्पर्धा चीनमधील
धाई येथे होणार असून, या स्पर्धेत जगभरातील २३ वर्षाखालील तरुणांना त्यांच्या कौशल्याचे
प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या
पार्श्वभूमीवर प्रवासाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कॉन्सिल तसेच विविध
औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर स्किल कॉम्पिटिशनचे
आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक
नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत.
या
स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा प्रमुख निकष असून, ५० क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म १
जानेवारी २००४ किंवा नंतरचा असणे आवश्यक आहे. तर १३ क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म
१ जानेवारी २००१ किंवा नंतरचा असावा.
जागतिक
कौशल्य स्पर्धेच्या नावनोंदणीसाठीची अंतिम मुदत आता १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात
आली आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर
भेट देऊन आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment