बुधवारी जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन
बुधवारी जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण
कार्यक्रमाचे आयोजन
बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : गत सहा वर्षांतील जिल्हा
शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा शिक्षक पुरस्कार
वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार, दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हा
कार्यक्रम गर्दे वाचनालय, बुलढाणा येथील सभागृहात होणार आहे.
या
कार्यक्रमात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
ना. प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे,
मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना.मकरंद जाधव यांच्या हस्ते पुरस्कार
वितरण होणार आहे.
सन 2019-2025
या कालावधीत जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी
निवड झालेल्या एकूण 70 शिक्षकांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन
सन्मानित करण्यात येणार आहे. सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे
सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, विधान परिषद आमदार वसंत
खंडेलवाल, आ. किरण सरनाईक, आ. धीरज लिंगाडे तसेच विधानसभा आ. चैनसुख संचेती, आ. संजय
कुटे, आ. श्वेता महाले, आ. संजय गायकवाड, आ. मनोज कायंदे, आ. सिद्धार्थ खरात आदी
उपस्थित राहणार आहेत. तसेच विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी डॉ.
किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश
तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
00000
Comments
Post a Comment