जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप आरक्षणाबाबत अधिसूचना प्रसिद्ध

 


जिल्हा परिषद  व पंचायत समित्यांच्या प्रारूप आरक्षणाबाबत अधिसूचना प्रसिद्ध

> प्रारुप आरक्षणावर हरकती व सुचनांसाठी १७ ॲाक्टोबरपर्यंत मुदत

 

बुलढाणा, दि. 14 (जिमाका) : जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती सभापती व सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली असून या प्रारुप आरक्षणाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

या प्रारूप आरक्षणाची अधिसूचना जिल्ह्यातील क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रारूप आरक्षण अधिसूचनेबाबत जनतेच्या काही हरकती असल्यास, त्यांनी त्या जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे 17 ॲाक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

बुलढाणा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्त्रियांकरिता राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत प्रारुप आरक्षणाच्या अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर तसेच तहसिलदार बुलढाणा, चिखली, देऊळगावं राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगांव, शेगांव, जळगांव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर व मोताळा यांचे कार्यालयातील फलकावर आणि पंचायत समिती बुलढाणा, चिखली, देऊळगावं राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगांव, शेगांव, जळगांव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर व मोताळा कार्यालयातील फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

प्रारुप आरक्षण आदेशाच्या मसु‌द्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची सकारण लेखी निवेदने, हरकती व सूचना जिल्हाधिकारी यांचेकडे 17 ॲाक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेली निवेदने, हरकती व सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या