अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त ग्रंथप्रदर्शन
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : अभिजात मराठी भाषा दिवस व सप्ताहानिमित्त जिल्हा ग्रंथालय
अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे मराठी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 3 ते 9 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सुरू असलेल्या
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. डॉ. किसनराव वाघ व ज्येष्ठ कवी सर्जेराव चव्हाण यांच्या
हस्ते झाले.
या वेळी डॉ.
वाघ यांनी "अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी" या विषयावर तर कवी चव्हाण
यांनी "मराठी काव्य-काल आज आणि उद्या" या विषयावर व्याख्यान दिले.
संचालन धनंजय
मऱ्हे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजय सिरसाट यांनी केले. हे ग्रंथप्रदर्शन 9 ऑक्टोबरपर्यंत
कार्यालयीन वेळेत सर्वांसाठी खुले राहणार असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment