सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन पालक सचिव शैला ए, जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांचे अभिवादन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 31 : भारताचे पहिले
उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि दिवंगत
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात
त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्ह्याचे पालक सचिव शैला ए., जिल्हाधिकारी डॅा. किरण
पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सरदार
वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा
नाझर मोतेकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००

Comments
Post a Comment