आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 3 (जिमाका) : देशात 25 जून 1975 ते 31 मार्च
1977 या कालावधीत आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात सामाजिक व राजनैतिक कारणांसाठी
लढा देतांना कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शासनाने मानधन योजना कार्यान्वित
केली असून या मानधनासाठी २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
त्यानुसार
आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेले पात्र लाभार्थी किंवा त्यांचे हयात पश्चात जोडीदार
(पती/पत्नी) ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनीच विहित नमुन्यातील अर्ज व शपथपत्रासह
जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 24 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक
आहे.
निश्चित
केलेल्या तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी,
असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment