सैनिकी कल्याण विभागात लिपिक टंकलेखक पदांची भरती
सैनिकी
कल्याण विभागात लिपिक टंकलेखक पदांची भरती
बुलढाणा,
दि. 14 (जिमाका): सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण 72 पदांकरिता माजी सैनिक
उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक माजी सैनिक उमेदवारांनी दि. 5 नोव्हेंबर
2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी
केले आहे.
वरिल पदांपैकी एक पद हे अंपग संवर्गातून
किमान 40 टक्के अंपगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये
व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता/उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. सदर भरती प्रक्रिया
टीसीएस-आयओएन (T.C.S-ION) मार्फत होणार आहे. परिक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात
येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवाराना वेब-बेस्ड
(web-based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtragov.in या संकेतस्थळावर (Resources Tab
Recruitment Tab) येथे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहिल. त्यानंतर सदर वेबलिंक
बंद होईल, याची नोंद घ्यावी.
0000
Comments
Post a Comment