नगरपरिषदेच्या प्रारुप मतदार याद्यांवरील हरकती, सुचनांवर १६ व १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी Ø उपविभगीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार सुनावणी
बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील ११ नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारुप मतदार
याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर १३ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे.
त्यानंतर प्राप्त हरकती व सुचनांबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली
नगरपरिषद कार्यालयांमध्ये १६ व १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याची
माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाने दिली आहे.
जिल्हा नगरविकास
प्रशासनाने सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या सुनावण्या उपविभागीय अधिकारी
यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद कार्यालयांमध्ये पार पडणार आहेत. त्यानुसार १६
ऑक्टोबर रोजी बुलढाणा, सिंदखेड राजा, मेहकर, शेगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर या
नगरपरिषदेचे प्रारुप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती, सुचनांवर सकाळी ११
वाजेपासून सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. तसेच १७ ऑक्टोबर रोजी चिखली, लोणार,
देऊळगाव राजा, खामगाव आणि नांदुरा या नगरपरिषदेचे प्रारुप प्रभागनिहाय आरक्षणाबाबत
प्राप्त हरकती व सुचनांवर सकाळी ११ वाजेपासून सुनावणी घेण्यात येणार आहे.
000
Comments
Post a Comment