अनोळखी मृतदेह आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन
अनोळखी मृतदेह
आढळला: ओळखणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका) दि. 16: सार्वजनिक रुग्णालय, बुलढाणा येथे चिखली येथुन अनोळखी
इसमाला उपचारासाठी दि. 15 ऑक्टोंबर 2025
रोजी भरती करण्यात आले. उपचारा दरम्यान
त्यांचा मृत्यू झाला. या मृत इसमास ओळखणाऱ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस
प्रशासनाने केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अनोळखी मृतकाचा रंग गोरा, उंची 5.4 इंच, अंगामध्ये निळसर रंगाचे जॉकेट, निळसर रंगाचे शर्ट, काळया रंगाची पॅन्ट, गळ्यामध्ये माळ व उजव्या मनगटावर गोंधलेले दिसत आहे. या वर्णनाचा इसमाचा कोणी नातेवाईक किंवा मित्रमंडळी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन, बुलढाणा(शहर) येथे किंवा पो.हे.कॉ. नरेंद्र रोटे 9623243733, विश्वास हिवाळे 8308578741 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000

Comments
Post a Comment