अनुकंपा उमेदवारांना शनिवारी नियुक्तीपत्रे वाटप होणार !
·
जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन
·
एमपीएससीच्या ५० उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे
मिळणार
बुलढाणा, दि. 03 (जिमाका): मुख्यमंत्री ना. देवेंद्र
फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी 150 दिवस कृती कार्यक्रमांतर्गत शनिवारी 4 ऑक्टोबर
रोजी अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात
सकाळी 11 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमात 184 अनुकंपा उमेदवारांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची
शिफारस प्राप्त 50 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहे. यात अनुकंपा गट क
व ड प्रवर्गातील 184 उमेदवारांमध्ये राज्य शासनाच्या विभागासाठी 36, जिल्हा परिषदेच्या
ग्रामविकास विभागासाठी 82, नगरपरिषदेसाठी 57, पोलीस विभागासाठी 9 उमेदवारांना नियुक्ती
पत्रे देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क सेवा मुख्य परीक्षाअंतर्गत
50 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला पालकमंत्री, सहपालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील
वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
००००
Comments
Post a Comment