३ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय लोकशाही दिन
बुलडाणा, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी व
अडचणींचे निरसन करण्यासाठी दि. 3 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आले आहे.
तक्रारदारांना
जिल्हास्तरीय लोकशाही दिनी स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास आपली तक्रार प्रभारी अधिकारी
लोकशाही दिन सामान्य प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांचे नावे रजिस्टर
पोस्टाने पाठविण्यास हरकत नाही. तसेच तक्रारकर्त्यांनी
आपल्या तक्रारी सर्व निकषांचे अवलोकन करुन परिपूर्ण स्वरुपातच जिल्हास्तरीय लोकशाही
दिनाचे तारखे आधीपर्यंत कार्यालयास प्राप्त होतील अशा हिशेबाने रजिस्टर पोस्टाने पाठवाव्यात.
·
अर्जदारांनी अर्ज करतांना स्विकृतीचे निकष :
1.अर्ज विहीत
नमुन्यात केलेला असावा. 2. तक्रार / निवेदन वैयक्तीक स्व्रुपाची असावी. 3. चारही स्तरांवरील
लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने अर्ज विहीत नमून्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक
राहील. 4. तालुका लोकशाही दिनानंतर 1 माहिन्यांने जिल्हाधिकारी लोकशाही दिनात अर्ज
करता येईल. जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन माहिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही
दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन माहिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज
सादर करता येईल.
·
‘हे’ अर्ज स्विकारले जाणार नाहीत :
1.न्याय प्रविष्ट
प्रकरणे 2. राजस्व अपिल्स 3. सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी. 4. विहीत नमून्यात नसणारे
व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज 5.अंतिम उत्तर दिलेले
आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणांत पून्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज 6. तक्रार / निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसेल तर 7. वरील
प्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्विकृत करता येऊ शकत नाहीत असे अर्ज सामान्य तक्रार
या स्वरुपात संबंधित विभागांकडे कारवाई कामी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार
संजिवनी मुपडे यांनी दिली आहे.
०००
Comments
Post a Comment