निवृत्ती वेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रावर 30 नोव्हेबरपर्यंत स्वाक्षरी करावी; जिल्हा कोषागार अधिकारी यांचे आवाहन

 


 

बुलडाणा,(जिमाका) दि.29: राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक, कुटूंब निवृत्ती धारक, माजी आमदार, इतर राज्य निवृत्ती वेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेमध्ये जावून विहीत नमुन्यातील हयात प्रमाण पत्रावर स्वाक्षरी करावी. तसेच स्वाक्षरीसोबत पॅन क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक नमुद करावा. संबधीत बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.  याबाबत निवृत्ती वेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या