शासकीय आयटीआय खामगाव येथे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू होणार बुधवारी शुभारंभ ; २१० जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा दि. ६ ऑक्टोबर (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने खामगाव येथील सद्गुरु श्री अंगारी काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तीन महिन्यांच्या अल्पमुदतीच्या ७ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमांचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

एकूण २१० जागांसाठी प्रवेश उपलब्ध असून, या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे, नोकरी करणारे तसेच गृहिणी – सर्व इच्छुक महिला-पुरुष उमेदवारांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. प्रवेशासाठी केवळ ₹१०० रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जाणार असून उमेदवारांनी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष संस्थेत येऊन प्रवेश घेऊ शकणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी:

 https://msbsvet.edu.in/dvetadmission2025

प्रवेशावेळी उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, आधार क्रमांक, छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक सोबत आणणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे  आवाहनसंस्थेचे प्राचार्य व्हि.बी. बचाटे, उपप्राचार्य व्हि.व्हि. काळे यांनी केले आहे.

या संस्थेत पुढील ७ अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू होत आहेत:

1.         Electrician Domestic Solution

2.         CNC Programmer

3.         Fashion Designer

4.        Light Motor Vehicle Driver

5.         Solar Panel Installation Technician

6.         Two Wheeler Service Assistant

7.        Digital Mitra

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या