ॲड. निलेश हेलोंडे यांनी घेतली डावरगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट

 



 बुलढाणा, दि. 8 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी बुधवारी सिंदखेड राजा तालुक्यातील डावरगाव येथील संतोष माळचिमणे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला की नाही याची माहिती घेतली. तसेच शासनाच्या शेतकरी हिताच्या योजना सुरु आहेत. त्यांचा लाभ गावखेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे निर्देश ॲड. निलेश हेलोंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी तहसीलदार अजित दिवटे, तालुका कृषी अधिकारी भागवत किंगर, गटविकास अधिकारी अभिजित बांगर, भास्कर घुगे, महिला बालकल्याणचे अधिकारी जीवन राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या