दुर्गोत्सव 2025 उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा,
(जिमाका) दि. 27 : अमृत संस्था यांच्या माध्यमातून
यंदाच्या दिवाळीच्या कालावधीत ‘दुर्गोत्सव 2025’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
या दुर्गोत्सवामध्ये नुकतेच 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचे नामांकन प्राप्त झाले
आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीमध्ये घराघरात किल्ले बनविण्याच्या परंपरेला एक नवे रूप
देत, नागरिकांनी या 12 किल्ल्यांपैकी कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती बनवून तयार
झालेल्या किल्ल्याचा स्वत:सह फोटो http://www.durgotsav.com या संकेतस्थळावर 10 नोव्हेंबर
2025 पर्यंत अपलोड करावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी यांनी
केले आहे.
रायगड,
राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेर दुर्ग, खांदेरीचा दुर्ग, पन्हाळगड, शिवनेरी,
विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग आणि जिंजी असे 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचे नामांकन
प्राप्त झाले आहे. राज्य शासनाच्या वतीने 'अमृत' (महाराष्ट्र संसोधन, उन्नती व प्रशिक्षण
प्रबोधिनी) संस्थेद्वारे महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचे महत्त्व
जगाच्या नकाशावर ठसविण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्याचा वारसा पोहोचवण्यासाठी
एक आगळा-वेगळा व प्रेरणादायी उपक्रम 'दुर्गोत्सव' आयोजित केला आहे. विशेषतः दिवाळी
सणाच्या निमित्ताने हा उपक्रम विश्वविक्रम करण्याचा संकल्प घेऊन साकारला जात आहे.
0000
Comments
Post a Comment