सैनिक सभामंडप सर्वांसाठी भाड्याने उपलब्ध
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने चालविण्यात येणारा
सैनिक सभामंडप सर्वसामान्य नागरिकांसाठी भाड्याने उपलब्ध करण्यात आला आहे.
सर्व सुविधा
असलेला हा सुसज्ज व भव्य सभामंडप बुलढाणा एस.टी. बस स्थानकापासून केवळ 25 मीटर अंतरावर
असून लग्न समारंभ, वाढदिवस, सभा व इतर कार्यक्रमांसाठी योग्य व माफक दरात देण्यात येत
आहे.
माजी सैनिक,
त्यांच्या विधवा आणि अवलंबितांसाठी विशेष सवलतीची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment