सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना तांत्रिक शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचे आवाहन
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील
सेवा व उद्योग क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था कार्यरत
आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण
करण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयांत अल्पकालीन अभ्यासक्रम
सुरू आहेत.
या अभ्यासक्रमांसाठी
दैनंदिन 4 ते 6 तासांसाठी सेवा निवृत्त सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांना अतिरीक्त वर्ग
समन्वयक म्हणून सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या माध्यमातून त्यांच्या ज्ञानाचा
व अनुभवाचा फायदा युवकांना मिळणार आहे.
या संधीचा जास्तीत
जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बुलढाणा यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment