प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आयटीआयमधील अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा शुभारंभ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे कार्यक्रमाचे आयोजन

 


बुलडाणा, दि. 6 ऑक्टोबर (जिमाका): महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा नवा अभ्यासक्रम सुरू होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शॉर्ट टर्म कोर्सेसचा शुभारंभ बुधवार, दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

हा उपक्रम कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या वतीने राबविण्यात येत असून, राज्यातील युवकांना विविध अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

या निमित्ताने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले उपस्थित राहणार आहेत.

या प्रशिक्षण उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तंत्रनिकेतन संस्थांमध्ये अल्पमुदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे युवकांना रोजगारक्षमता वाढविण्यासह स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होणार आहेत.

या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा चिखली तालुक्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखलीचे प्राचार्य बी. बी. बेदरकर यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या