अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती; ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

        बुलडाणा, (जिमाका) दि. 17 :  केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 करीता अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन सहायक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.  

 

परदेशात शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारते. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण 125 जागा दिल्या जातात, त्यापैकी 115 जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, 6 जागा विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींसाठी आणि 4 जागा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवारांसाठी राखीव आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://nosmsje.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

 

            पात्रता : अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवार असावा. भारताचा रहिवासी असावा, वयोमर्यादा 35 वर्ष, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 500 आत असावी.  

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या