सैनिकी सभामंडप भाड्याने उपलब्ध; माजी सैनिक, विधवा व अवलंबितांना विशेष सवलत
बुलडाणा,
(जिमाका) दि. 28 : येथील सर्व सुविधा उपलब्ध
असलेले, सुसज्ज व भव्य सैनिकी सभामंडप आता सर्वसामान्य नागरिकांसाठी भाड्याने उपलब्ध
करण्यात आले आहे. हा सभामंडप जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात, एस.टी. बस स्थानकापासून
केवळ 25मीटर अंतरावर असून लग्न समारंभ, वाढदिवस, सभा तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी
वापरता येणार आहे.
सदर
सभामंडप सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या, योग्य व माफक दराने भाड्याने दिला जाणार असून,
माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा आणि अवलंबितांना विशेष सवलत देण्यात येणार आहे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या सुविधेचा जास्तीत
जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
00000
Comments
Post a Comment