शासनमान्य ग्रंथांच्या यादीसाठी नव्या ग्रंथांची मागणी
बुलढाणा,
दि. 8 (जिमाका) : ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासकीय व शासनमान्य
सार्वजनिक ग्रंथालयांसाठी शासनमान्य ग्रंथांची वर्षनिहाय यादी प्रकाशित केली जाते.
सन 2024 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी
भाषेतील प्रथम आवृत्ती ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ग्रंथालय
संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई येथे विनामूल्य पाठविण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
या संदर्भातील
सविस्तर निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि ग्रंथालय संचालनालयाच्या
www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती प्र. ग्रंथालय
संचालक अशोक गाडेकर यांनी दिली आहे.
00000
Comments
Post a Comment