कै.वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलांडे यांचा जिल्हा दौरा
बुलढाणा, दि. 7 (जिमाका): कै.वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.
निलेश हेलांडे (पाटील) हे बुधवार दि. 8 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर
येणार आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार दुपारी २ वाजता सिंदखेड राजा येथील विश्रामगृह
येथे तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या, चारा
लागवड व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व करण्यात आलेली मदत यासंबंधी बैठक, दुपारी ३
वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट, दुपारी ४.१५ वाजता देऊळगाव राजा येथील
विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांसमवेत बैठक, साय. ५ वाजता शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट, सायं. ५.४५
वाजता सिंदखेड राजा मार्गे अमरावतीकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment