डिजिटल व्यवहारांसाठी डाक विभागाची विशेष मोहीम:
·
प्रीमियम,
पॉलिसी, दाव्यांची माहिती तत्काळ मिळणार
·
ग्राहकांनी
केवायसी दस्तऐवजांसह माहिती सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा, (जिमाका)
दि. 24 : भारतीय
डाक विभागाच्या वतीने डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेंतर्गत डिजिटल
व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम बुलढाणा विभागात 16
ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत सर्व सक्रिय
पॉलिसीधारकांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्ययावत करून व्यवहार प्रक्रिया अधिक
पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. पॉलिसीधारकांनी
आपले अद्ययावत संपर्क तपशील दिल्यास त्यांना प्रीमियम भरपाई, पॉलिसी स्थिती, दावा प्रक्रिया
यासंदर्भातील सर्व माहिती तत्काळ एसएमएस व ई-मेलद्वारे मिळणार आहे.
ग्राहकांनी आपल्या जवळच्या मुख्य
किंवा उप टपाल कार्यालयात भेट देऊन आवश्यक केवायसी दस्तऐवजांसह माहिती सादर करावी.
ग्रामीण भागातील शाखा टपाल कार्यालयांमध्येही ही प्रक्रिया सुलभतेने पूर्ण होणार आहे.
डिजिटलायझेशनच्या या उपक्रमामुळे
डाक जीवन विमा सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर होऊन ग्राहक सेवा दर्जा उंचावेल,
असा विश्वास व्यक्त करत सर्व नागरिकांनी या मोहिमेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन
बुलढाणाचे डाक अधीक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment