इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे 15 ॲाक्टोबरला उद्घाटन
इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नवीन कार्यालयाचे 15 ॲाक्टोबरला उद्घाटन
बुलढाणा,
दि. 14 (जिमाका) : इंडियन रेड क्रॉस सोसायटी या सेवाभावी संस्थेच्या
नवीन कार्यालयाचे उद्घाटन व सेवाकार्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी
(दि. 15) दुपारी 3 वाजता टीबी हॉस्पिटल (क्षय आरोग्य धाम) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या
प्रांगणात पार पडणार आहे.
या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय
आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रिडा व युवक
कल्याण राज्यमंत्री ना.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री ना.मकरंद जाधव, वस्त्रोद्योग मंत्री तथा सह पालकमंत्री,
ना.संजय सावकारे, कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर हे राहणार आहेत. विधान परिषद सदस्य
किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, विधानसभा सदस्य आ.चैनसुख संचेती, आ.डॉ संजय
कुटे, आ. संजय गायकवाड, आ.श्वेताताई महाले, आ.सिद्धार्थ खरात, आ.मनोज कायंदे यांची
विशेष अतिथी म्हणुन उपस्थिती राहणार आहे.
तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष तथा
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पोलिस
अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा शल्य चिकित्सक तथा पदसिद्ध उपाध्यक्ष (इंडियन रेड क्रॉस
सोसायटी) डॉ. दत्तात्रय बिराजदार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास
झिने, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, बुलडाणा अर्बन अध्यक्ष डॉ. सुकेश
झंवर, दिव्यांग व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश छाजेड, भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट
असोसिएशन चे सचिव अनिल नावंदर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र
काळे, बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, क्षय आरोग्य धाम चे वैद्यकीय
अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण, डॉ. दीपक लध्दड, आयएमएचे डॉ. केदार शर्मा, डॉ. अजित शिरसाठ,
निमा संघटनेचे डॉ.गजानन पडघान, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ चे डॉ. राजेश्वर उबरहंडे
यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमाला सर्व समाजसेवी संस्थाचे पदाधिकारी व
नागरीकांना उपस्थित राहण्याचे आवाहन इंडियन रेड क्रॉस सोसायटी बुलढाणाचे कार्याध्यक्ष
विनोद जवरे, उपकार्याध्यक्ष ॲड.जयसिंग देशमुख, सचिव रवींद्र लहाने, कोषाध्यक्ष विकास
दळवी आदींनी केले आहे.
००००
Comments
Post a Comment