‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शेलगाव आटोळ येथे महिलांची आरोग्य तपासणी
बुलढाणा, दि. 01 (जिमाका): “स्वस्थ
नारी सशक्त परिवार अभियान” अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र,
शेलगाव आटोळ येथे महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात गर्भवती
महिलांसह बालकांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण ५४
गर्भवती माता, ९ बालके, ११ ईसीजी तपासण्या, ६० बीपी तपासण्या, ६८ हिमोग्लोबिन तपासण्या,
५४ एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या. तसेच २९ पीएमजेएवाय कार्ड, २५ आभाकार्ड वितरित
करण्यात आले. याशिवाय २९ रुग्णांची आरबीएस तपासणीही करण्यात आली.
या शिबिरात तज्ज्ञ
डॉक्टरांनी महिलांना मार्गदर्शन केले. प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉ. अतुल पवार आणि
बालरोग तज्ञ डॉ. पवन आखाडे यांनी महत्त्वपूर्ण सेवा दिली. संपूर्ण शिबिर तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. ऋषिकेश कणखर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद
वायाळ, डॉ. सुमित पैठणे व डॉ. पल्लवी राजपूत यांच्या देखरेखीखाली शिबिर यशस्वीरित्या
संपन्न झाले. या उपक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच
आशा गटप्रवर्तक व स्वयंसेविका यांचे विशेष सहकार्य लाभले.
000
Comments
Post a Comment