बुलढाणा डाक कार्यालयातर्फे राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन
बुलढाणा, दि. 1 (जिमाका):
बुलढाणा डाक विभागात ६ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे
आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये डाक विभागाच्या प्रवासाबाबत, नविन बदलांविषयी
जनजागृती तसेच विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार
असून नागरिकांमध्ये डाक विभागाविषयी जनजागृती होणार आहे.
डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा तसेच राष्ट्रीय
टपाल सप्ताहामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन गणेश आंभोरे, डाक अधीक्षक,
बुलडाणा विभाग यांनी केले आहे.
०००
Comments
Post a Comment