समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी

 

समूह साधन केंद्र समन्वयक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा संदर्भात शुद्धीपत्रक जारी

 

बुलडाणा, दि. 17 (जिमाका):  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा–2025 या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत करण्यात येणार आहे.

 

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.  

 

नवीन शुद्धीपत्रकानुसार, अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी.ए., बी.कॉम. किंवा बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णय दिनांक 29 ऑगस्ट 2025 नुसार 1 जानेवारी 2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. याशिवाय, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षांची अखंडित सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक पदावरील सेवा यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त कैलास दातखीळ यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या