Posts

Showing posts from September, 2025

क्षय आरोग्य धाम येथे राष्ट्रीय पोषण महिना निमित्त जनजागृती उपक्रम साजरा

Image
  बुलडाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): दरवर्षी सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो. रुग्णाच्या आरोग्या संबंधित तक्रारी साठी केवळ औषधोपचारावर अवलंबून न राहता आहार देखील एक उपचार किंवा आहारद्वारे आरोग्य या विषयी समाजात जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने कुपोषनावर आळा घालण्यासाठी पोषण महिना साजरा केला जातो. तसेच महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या आणि समाज्याच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत “ स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये महिलांच्या विशिष्ट आरोग्य विषयक सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जात आहे. याच   अनुषंगाने दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी क्षय आरोग्य धाम बुलढाणा येथे सर्व क्षय बाधित   रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आहार प्रदर्शनी व आहार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करून...

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा

Image
  बुलढाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे , निवासी उपजिल्हाधिकारी   सदाशिव सेलार, तहसिलदार वृशाली केसकर,संजय महाले,विजय पाटील,जिल्हा नाझर मेतेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 000

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा संपन्न

Image
    बुलढाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली. या सभेला पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत प्रलंबित असलेले चौकशी व कार्यवाहीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सदाशीव शेलार यांनी दिले. 000

2721 भूमिहीनांना मंजूर घरकुलासाठी हक्काची जागा · सेवा पंधरवडाअंतर्गत भूमिहीन मंजूर घरकुल लाभार्थ्यांना 16.34 हेक्टर जमीन उपलब्ध

    बुलढाणा, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): महसूल विभागामार्फत “ छत्रपती शिवाजी महाराज मास्टर अभियान ” अंतर्गत जिल्ह्यात 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या सेवा पंधरवड्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाकडून बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 2721 भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना एकूण 16.34 हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.   या उपक्रमामुळे जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी हक्काची जागा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेचा उद्देश महसूल व वन विभाग तसेच इतर संबंधित विभागांमध्ये प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करणे आहे. या उपक्रमात “ सर्वांसाठी घरे 2025 ” योजनेखाली भूमिहीन घरकूल लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार शासकीय जमिनींचे हस्तांतरण जिल्हा प्रशासनाकडून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्यात आले आहे. शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजना...

शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर Ø नव्याने मतदार याद्या तयार होणार

    बुलढाणा, दि. 30 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरिक्षण करुन नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याचे पत्रक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे.   या मतदार नोंदणी कार्यक्रमासाठी अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी अधिकारी असून, बुलढाणाचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्य करतील. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी व तहसीलदार हे पदनिर्देशित अधिकारी असतील. पुनरिक्षण कार्यक्रम : या पुनरिक्षण कार्यक्रमानुसार    30 सप्टेंबर रोजी सूचना प्रसिद्धी,   15 ऑक्टोबर 2025 प्रथम पुनःप्रसिद्धी, 25 ऑक्टोबर रोजी द्वितीय पुनःप्रसिद्धी,    नमुना 18 व 19 द्वारे दावे व हरकती सादर करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर राहील. 20 नोव्हेंबर रोजी हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई करुन 25 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्र...

शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न

Image
    बुलढाणा, दि. 30 (जिमाका): अमरावती विभागातील शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमासंदर्भात राजकीय पक्षांना माहिती देण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक संपन्न झाली.              या बैठकीला उपजिल्हाधिकारी सुहासीनी गोणेवार, उपशिक्षणाधिकारी (मा) आशिष वाघ, भाजपाचे मंदार बाहेकर, अजित गुऱ्हे, काँग्रेसचे सुनिल सपकाळ, सीपीएमचे जितेंद्रकुमार चोपडे,   राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चे ज्ञानेश्वर शेळके, काँग्रेसचे ए. आर. राजपुत, शिवसेना (उ.बा.ठा) चे लखन गाडेकर, मनसेचे   अमोल पाटील, बहुजन समाज पार्टीचे सुरेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे एस.टी. सोनोने, शिवसेना (शिंदे) चे दिलीप सरकटे आदी उपस्थित होते.              या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या टप्प्यांची माहिती देतांना म्हणाले,   मागच्या निवडणुकीत 7,784 मतदार होते. जुन्या मतदार याद...

ओबीसी, ईबीसी व डीएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम यशस्वी अंतर्गत उच्च दर्जाचे शिक्षण

  Ø   9 वी ते 12 वीतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन Ø   30 सप्टेंबरपर्यंत मुदत   बुलडाणा, दि. 29 सप्टेंबर (जिमाका): आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या ओबीसी, ईबीसी व डीएनटी विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनानची पीएम यशस्वी टॉप क्लास स्कुल एज्युकेशन शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री यशस्वी अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभगाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे. या टॉप क्लास एज्युकेशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांची निवड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in या संकेतस्थळावर 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जात प्रमाण...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव शेतकऱ्यांच्या बांधावर !

Image
·          अतिवृष्टीबाधीत भागांची केली पाहणी ·          आपत्तीग्रस्त भागांचे युद्धपातळीवर पंचनामे करा ·          गावकऱ्यांनी पंचनामे पूर्ण करुन घ्यावे ·          पंचनाम्याचे चावडी वाचन करा   बुलडाणा, दि. 29 सप्टेंबर (जिमाका): राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे सुमारे ७० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ७१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी  व पुरामुळे नुकसान झालेल्या भागांची आज केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.   बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या पाडळी, नळकुंड, उबाळखेड आणि गुळभेली या...

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

Image
    बुलडाणा, दि. 26 सप्टेंबर (जिमाका): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांनी आज तालुक्यातील नळकुंड, मलकापूर तालुक्यातील दाताळा, जांबुळ धाबा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. मागील जून ते ऑगस्ट महिन्यातील अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई वितरित केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात गेल्या काही दिवसात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन घ्यावे. नदीजकवळील खरडून गेल्या जमिनी व वाहून गेलेल्या शेतीपूरक साहित्य, जनावरे आणि पडझड झालेल्या घरांची नोंद करुन घ्यावी.आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, असे आश्वस्त करत पालकमंत्री ना. पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील, मुख्य कार्...

नद्यांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम प्राधान्याने करा -पालकमंत्री ना. मकरंद पाटील

Image
    ·          अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करा ·          दिवाळीआधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत ·          जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ·          प्रशासकीय मान्यता पूर्ण करा   बुलडाणा, दि. 26 सप्टेंबर (जिमाका): जिल्ह्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे नद्यांची पाणी पातळी वाढून ते पाणी शेत शिवारात जावून शेतीचे नुकसान होत आहे. त्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियांनांतर्गत नद्यांतील गाळ काढणे आणि खोलीकरण करण्याचे काम प्राधान्याने करावे. इंधनासाठी निधी दिला जाईल. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी प्रशासनाने प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी आज दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीला सहपालकमंत्री ना. संजय सावकारे, आम...

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाचे हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुभारंभ

  बुलडाणा, दि. 26 सप्टेंबर (जिमाका): स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाची सुरुवात हतेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथून झाली असून विशेष शिबिराचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. यावेळी हतेडी बु. व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.   या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गायकवाड होते. तर हतेडी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीकांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते उपस्थित होते.             आरोग्य शिबिरामध्ये   स्त्रीरोग तज्ञ डॉ. नीलगंधा शिंदे,   त्वचारोग तज्ञ डॉ. पाबीलवार, दंतरोग तज्ञ डॉ. शरद काळे, बालरोग तज्ञ डॉ. भरत लहाने या तज्ज्ञ डॉक्टरांनी शिबिरामध्ये 300 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली. शिबिराचे यशस्वी आयोजनासाठी डॉ. अरुण जवंजाळ, डॉ. कविता बंगले तसेच संपूर्ण आरोग्य सेवा कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. 0000000

खामगांव-जालना रेल्वे प्रकल्पाला मान्यता द्यावी ; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवून केली आग्रही मागणी..!!

Image
  बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : बहुप्रतिक्षित खामगांव-जालना रेल्वे मार्गाच्या कामाला त्वरीत मान्यता प्रदान करावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैश्णव यांच्याकडे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांची भेट घेऊन केली आहे.             खामगांव-जालना हा रेल्वे मार्ग व्हावा अशी अपेक्षा बुलढाणा लोकसभा मतदार संघातील नागरिकांची आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगांव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पूण करण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या ५० टक्के खर्चाला मंजुरात प्रदान करुन हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडे पाठविला आहे.   या रेल्वेमार्गाच्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन या प्रकल्पाला मंजुरात प्रदान करावी, अशी मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्ली येथे   केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनीह...

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा

  बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ना. संजय सावकारे हे दि.२६ सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता माजी मंत्री डॅा. राजेंद्र शिंगणे यांच्या निवासस्थानी भेट देतील. दुपारी १२ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती, त्यानंतर दुपारी २ वाजता भुसावळकडे रवाना होतील. ००००  

अण्णासाहेब पाटील यांची ९२ वी जयंती महामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात साजरी

Image
    बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या बुलढाणा जिल्हा कार्यालयात गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी माथाडी कामगार चळवळीचे संस्थापक व मराठा आरक्षण चळवळीचे जनक, मराठा क्रांतीसूर्य कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त गणेश बिटोडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक वैभव मुंढे, जिल्हा समन्वयक सूरज जगताप, तसेच संजीवनी नाईकवाडे, सविता वाकोडे, संतोष पडघान, सतिश शेळके, राहुल सुरडकर, सचिन पवार, गोपाल चव्हाण, योगेश लांडकर, शुभम पवार, आकाश जाधव, रितेश निंबाळकर यांसह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील यांचे कार्य व योगदान अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी युनियनची स्थापना करून कामगारांच्या हक्कासाठी ऐतिहासिक चळवळ उभारली. तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना करून मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी कार्य केले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ...

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
  बुलडाणा, (जिमाका) दि. 25 : पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.   निवासी जिल्हाधिकारी सदाशीव शेलार   यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड,   तहसीलदार वृषाली केसकर, जिल्हा नाझर गजानन मोतेकर यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 0000