उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा जाहीर

 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा तालुका शिबिर दौरा जाहीर

 

बुलडाणा, दि. ३ (जिमाका): जिल्ह्यातील मोटार वाहन चालका, मालकाच्या सोईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरिक्षक यांचा जुलै ते डिसेंबर दरम्यान मासिक शिबीर दौरा जाहीर करण्यात आला आहे.

या दौऱ्यात वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, वाहन तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती विषयी कामकाज केले जाणार आहे.

शिबिर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : जुलै महिन्यात मेहकर येथे 4 व 21, देऊळगाव राजा येथे 8 व 23, लोणार येथे 11 व 25, चिखली 15 व सिंदखेड राजा येथे 17 रोजी तर ऑगस्ट महिन्यात मेहकर येथे  4 व 20, देऊळगाव राजा येथे 6 व 25, लोणार येथे  11 व 28, चिखली येथे 13  व सिंदखेड राजा येथे 18 ऑगस्ट  रोजी होणार आहे.

सप्टेंबर महिन्यात मेहकर येथे  14 व 18, देऊळगाव राजा येथे 8 व 23, लोणार येथे  10 व 25, चिखली येथे 12  व सिंदखेड राजा येथे 16 सप्टेंबर  रोजी होणार आहे. ॲाक्टोंबर महिन्यात मेहकर येथे  6 व 17, देऊळगाव राजा येथे 8 व 27, लोणार येथे  10 व 29, चिखली येथे 13  व सिंदखेड राजा येथे 15 ॲाक्टोबर रोजी होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात मेहकर येथे  4 व 17, देऊळगाव राजा येथे 6 व 19, लोणार येथे  10 व 21, चिखली येथे 12  व सिंदखेड राजा येथे 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डिसेंबर महिन्यात मेहकर येथे  5 व 17, देऊळगाव राजा येथे 8 व 19, लोणार येथे  10 व 22, चिखली येथे 12  व सिंदखेड राजा येथे 15 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या