वसंतराव नाईक महामंडळ; स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

वसंतराव नाईक महामंडळ; स्वयंरोजगाराच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 16 (जिमाका):  वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना राबविण्यात येते. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, तसेच पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपनीमार्फत वडार व रामोशी समाजातील नागरिकांसाठी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, लघू उद्योग, वाहतूक क्षेत्रातील संबंधित व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक आणि महामंडळामाध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे.

वैयक्तिक कर्ज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 15 लाख रुपये तर गट कर्ज योजनेअंतर्गत 50 लाख रुपये पर्यंत कर्जाचा लाभ घेता येतो. लाभार्थ्याने बँकेत मुद्दल आणि व्याज भरणे आवश्यक असून, त्यानंतर महामंडळ 12 टक्के व्याज रकमेपर्यंतची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात परतफेड करते. यासाठी www.vjnt.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

याशिवाय बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 5 लाख पर्यंतचे कर्ज, तर थेट कर्ज योजनेअंतर्गत 1 लाखांचे बिनव्याजी कर्ज महामंडळाच्या कार्यालयात थेट अर्ज करून मिळू शकते. जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), बुलढाणा यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलढाणा येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 07262-295319 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या