विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

 

विकसित महाराष्ट्र 2047; नागरिक सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 11 (जिमाका):  विकसित महाराष्ट्र 2047 करिता व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरविण्यासाठी नागरिकांनी नागरिक सर्वेक्षणात सहभागी व्हावे,  असे आवाहन नियोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. विकसित महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी https://wa.link/o93s9m या लिंकचा वापर करावा.

सर्वेक्षणात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शासनाने सर्व विभागांना व प्रशासन यंत्रणेला व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शाळा-महाविद्यालये, स्थानिक केबल नेटवर्क, एफ.एम. रेडिओ, साप्ताहिके, वर्तमानपत्रे, बाजारपेठा, गावाच्या वेशीवर फलक, व्हाट्सॲप ग्रुप, पथनाट्य आणि फिरती प्रचारवाहने आदी माध्यमांचा समावेश आहे.

या सर्वेक्षणाद्वारे, नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजनला आकार देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात 7 सोपे प्रश्न विचारले आहेत. आपण ऑप्शन्स निवडू शकता, लिहू शकता आणि आवाज रेकॉर्ड करू शकता. शासनाकडून असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन, त्यानुसार रोडमॅप तयार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे विकसित महाराष्ट्र 2047 करिता नागरिक https://wa.link/o93s9m या लिंकवर क्लिक करून जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या