जागतिक काविळ दिनानिमित्त जनजागृती रॅली
जागतिक काविळ दिनानिमित्त जनजागृती रॅली
बुलडाणा, दि. 30 (जिमाका): जागतिक
काविळ दिनानिमित्त आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या वतीने आज शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन
करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार व जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीच्या
वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत
तांगडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगटे, बाह्य रुग्ण विभाग प्रमुख, काविळ नियंत्रण
कार्यक्रम प्रमुख, रक्त संक्रमण अधिकारी, आर.बी.एस.के. समन्वयक, औषध निर्माण अधिकारी,
प्रयोगशाळा, आयसीयू, एन.व्ही.एच.सी.पी., तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभाग व परिचर्या
केंद्राचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या
रॅलीत जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनी
यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नर्सिंग प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य खेडेकर
यांनी रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
00000
Comments
Post a Comment