शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांनो, घरच्या बियाण्याचे संरक्षण करा; कृषि विभागाचे आवाहन
बुलढाणा,दि. 21 (जिमाका): खरीप
हंगामासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्याचा वापर करावे. बदलत्या हवामान परिस्थिती आणि
बाजारातील बियाण्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता, स्वतःचे बियाणे जपून ठेवणे ही
शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची बाब ठरत आहे. सर्व शेतकऱ्यांनी पुढील हंगामासाठी घरच्या
बियाण्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी
केले आहे.
घरच्या
बियाण्याचे फायदे : बाजारातील महागड्या बियाण्यांचा खर्च टाळता येतो. स्थानिक हवामान व जमिनीस अनुरूप बियाण्यांची उगमशक्ती
चांगली राहून गुणवत्तेबाबत सुनिश्चिता असते. इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या बळावर
शेती करता येते. स्थानिक, पारंपारिक व दुर्मिळ वाण टिकवता येतात.
बियाणे
साठवताना योग्या काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बियाण्याची उगवण क्षमता व किडींपासून
सुरक्षित राहण्यासाठी निरोगी व रोगमुक्त झाडांपासूनचे बियाणे निवडावे, बियाणे नीट स्वच्छ
करून, त्यातील ओलावा पूर्णपणे काढून वाळवावेत. बियाणे हवाबंद डबे, पोती किंवा मातीची
भांडी यामध्ये कोरड्या, थंड व अंधाऱ्या ठिकाणी ठेवावेत. किंड नियत्रंणासाठी कडुलिंबाचा
पाला किंवा राख याचा वापर करून नैसर्गिक संरक्षण करावे. बियाण्यांवर वाणाचे नाव व साठवण्याची
तारीख लिहावे.
प्रतिबंधात्मक
उपाययोजनामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध होऊन त्यांची
आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होईल.
Comments
Post a Comment