प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार; शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;

शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

 बुलढाणा, दि. 8 (जिमाका) : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याचा लाभ जुलै, 2025 मध्ये वितरीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 3 हजार 222 शेतकऱ्यांची ई केवायसी आणि 4 हजार 534 शेतकऱ्यांचे आधार सीडिंग प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी प्रलंबित ई केवायसी, आधार सीडिंग व बँक खात्याला डिबीटी इनेबल करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डिबीटी इनेबल करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ई-केवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे, नसल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक किंवा गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा म्हणजे लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

०००

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या