सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा
सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचा जिल्हा दौरा
बुलढाणा,दि.25(जिमाका) : राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील हे शुक्रवार
व शनिवार दि. 25 व 26 जुलै 2025 रोजी शेगाव व खामगाव जि. बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत
आहेत.
त्यांच्या दौरा कार्यक्रमानुसार
दि. 25 जुलै रोजी रात्री 9.15 आनंद विसावा, शेगाव जि.बुलढाणा येथे आगमन व राखीव.
शनिवार दि.26 जुलै
2025 रोजी सकाळी 7 वाजता श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन. सकाळी 7.30 वाजता आनंद विहार
येथे कार्यकर्त्यांशी भेट. सकाळी 9.30 वाजता खामगावकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता ब्रिटिश
कालीन विश्रामगृह, खामगाव येथे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत आढावा बैठक. सकाळी 11.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन. सकाळी 11.45 वाजता शहर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन. दुपारी 12 वाजता टॉवर चौक येथे
महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन, दुपारी 12.15 वाजता सानंदा
निकेतन येथे सदिच्छा भेट व राखीव.
दुपारी 1.15 वाजता एकबोटे
चौक, अग्रसेन चौक येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष जनसंपर्क कार्यालयास भेट. दुपारी 1.30 वाजता शिवाजी महाराज स्टेडीअम समोर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्घाटन. दुपारी 1.40 वाजता छत्रपती शिवाजी
महाराजांच्या अश्र्वारुड पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन. दुपारी 1.50 वाजता केशवराव कापले
यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 2 वाजता मस्तान चौक येथील मस्तानशाह बाबा
दर्गा येथे चादर चढविणे, दुपारी 2.15 वाजता मोहन चौक येथे देवेंद्र देशमुख यांच्या
निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 2.30 वाजता सुटाळा येथे छत्रपती संभाजी महाराज व संताजी
महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन. दुपारी 2.45 वाजता घाटपुरीनाका येथे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उद्घाटन, दुपारी 3 वाजता घाटपुरी ग्रामपंचायत
समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे
उदघाटन. दुपारी 3.15 वाजता जळका भडंग गाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखेचे
उद्घाटन. दुपारी 4 वाजता भारत लॉन येथे शेतकरी मेळावा व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता पिंपळगाव राजा येथे राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाच्या शाखेचे उदघाटन, सायंकाळी 7.30 वाजता राखीव व रात्री 8 वाजता नांदुरा
रेल्वेस्टेशनकडे प्रयाण व आगमन. रात्री 9.45 वाजता नांदुरा रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment