मेहकर येथे 29 जुलैला विशेष मासिक शिबीर
मेहकर येथे 29 जुलैला विशेष मासिक शिबीर
बुलढाणा,दि.28(जिमाका) : मोटार
वाहन चालक व मालक यांच्या सोयीसाठी तसेच स्थानिक मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या मागणीनुसार
परिवहन विभागामार्फत मंगळवार दि. 29 जुलै रोजी मेहकर तालुक्यात विशेष अतिरिक्त मासिक
शिबीर दौरा आयोजित करण्यात आला आहे. या शिबिराचा वाहन चालक व मालकांनी लाभ घ्यावा,
असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
अतिरिक्त
शिबिरांमध्ये वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, वाहन तपासणी, तसेच वाहन चालक अनुज्ञप्ती
संबंधित सर्व कामकाज करण्यात येणार आहे. या शिबिरात मोटार वाहन निरीक्षक उपस्थित राहून
संबंधित कामकाजाचे निराकरण करतील, त्यामुळे वाहनधारक, चालक व ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी
याचा लाभ घ्यावा. सर्व संबंधितांनी या शिबिराची
नोंद घेऊन आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
0000000
Comments
Post a Comment