डाक सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन शनिवारी(2 ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद
डाक
सेवांमध्ये डिजिटल क्रांती; आय.टी. 2.0 अप्लिकेशनचे कार्यान्वयन
शनिवारी(2
ऑगस्ट) जिल्ह्यातील डाक सेवा बंद
बुलढाणा, दि. 28 (जिमाका) : भारतीय डाक विभाग आपल्या
सेवा प्रणालीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यासाठी ‘आय.टी. 2.0’ या महत्त्वाकांक्षी
उपक्रमांतर्गत एपीटी (APT) अप्लिकेशन ही नवीन डिजिटल प्रणाली कार्यान्वित करत आहे.
या नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे डाक व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख
होणार असून, यामुळे पोस्ट ऑफिसमधील सेवा आणखी सक्षम होणार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाखा टपाल कार्यालये व
उपडाकघरांमध्ये ही प्रणाली मंगळवार दि. 5 ऑगस्ट 2025 पासून होणार होती. परंतु रक्षाबंधन
सणामुळे नव्या प्रणालीची अंमलबजावणी आता सोमवार दि. 4 ऑगस्टपासून होणार आहे. या संक्रमणासाठी
आवश्यक असलेल्या डेटाच्या स्थलांतराची प्रक्रिया सोमवार दि. 4 ऑगस्ट रोजी होणारी ती
आता शनिवार दि. 2 ऑगस्ट 2025 रोजी पार पडणार आहे. नागरिकानी यांची नोंद घ्यावी. तसेच
शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करता
येणार नसल्याने नागरिकांनी महत्त्वाची कामे 2 ऑगस्टपूर्वीच पूर्ण करावीत, जेणेकरून
व्यवहारात अडथळा येणार नाही, अशी माहिती अधिक्षक डाकघर, बुलढाणा यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे
दिली आहे.
0000000
Comments
Post a Comment