कोलवड आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
कोलवड आदिवासी
मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
बुलडाणा, दि. 9 (जिमाका): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला
अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोलवड जि. बुलढाणा येथे
शैक्षणिक सत्र 2025-26 करीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील
तसेच आजुबाजूच्या जिल्ह्यांतील पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे
आवाहन गृहपाल एस.एस. चौरपगार यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी 10 जुलै २०२५ पर्यंत https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत वसतिगृह कार्यालयात
प्रत्यक्ष सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरतानाच्या सूचनानुसार अर्जात स्वतःचा मोबाईल
क्रमांक नोंदवावा. मोबाईल क्रमांक आधार व बँक खात्याशी जोडलेला असावा. नावाची नोंदणी
करताना आधारकार्डवरील नावासारखेच तंतोतंत भरावे. अर्जासोबत पालक व विद्यार्थ्यांचे
स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक. त्याचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी कागदपत्रे: जातीचा प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड,मागील
शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक, बोनाफाईड प्रमाणपत्र किंवा प्रवेश पावती, बँक पासबुक, दोन
पासपोर्ट साईज फोटो, पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र (स्वरूप संकेतस्थळावर
उपलब्ध).
विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज भरताना दिलेली सर्व माहिती अचूक व सत्य असल्याची
खात्री करूनच सादर करावी. चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.
अधिक माहितीसाठी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोलवड बुलढाणा येथे संपर्क साधावा,
असे गृहपाल यांनी कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment