जिल्हा परिषदेत ‘कृषी दिन’ उत्साहात साजरा
कै. वसंतराव नाईक यांना
जयंतीदिनी अभिवादन
प्रगतिशील शेतकऱ्यांचा
गौरव
बुलढाणा,दि. 2 (जिमाका) : हरित
क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी
विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या श्री. शिवाजी सभागृह येथे आयोजित 'कृषी दिन' मोठ्या
उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील होते. या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी
अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, उप मुख्य कार्यकारी
अधिकारी आशिष पवार, जिल्हा व्यवस्थापक महाबिज अशोक ठाकरे, आयोजक पुरुषोत्तम अनगाईत
व जिल्हा कृषी अधिकारी दिनकर मेरत आदी मान्यवर उपस्थित होते.
या
कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शेतकऱ्यांना शेतीत नफा वाढवण्यासाठी
बीजोत्पादन, सामूहिक शेती, उत्पादक कंपनी, फळबाग लागवड यांसारख्या उपक्रमांचे महत्त्व
पटवून दिले. तसेच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर कसा करता येईल हे समजावले.
कृषी
विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अमोल झापे यांनी जमिनीच्या सुपीकतेचे संवर्धन
व उत्पादन क्षमता वाढीबाबत मार्गदर्शन केले. आत्माचे प्रकल्प संचालक, पुरुषोत्तम उन्हाळे,
यांनी प्रक्रिया उद्योग व सामूहिक विक्री व्यवस्थेबाबत माहिती दिली. श्रीमती शारदा
कोकाटे, प्रगतिशील महिला शेतकरी यांनी आधुनिक शेती व पूरक व्यवसायांबाबत अनुभव सांगितला.
प्रितेश डहाके यांनी शेती पिकांसाठी योग्य बाजारपेठ निवडीचे महत्त्व सांगितले.
प्रगतिशील
शेतकऱ्यांचा गौरव
जिल्ह्यात
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० प्रगतिशील महिला शेतकरी व १३ प्रगतिशील
पुरुष शेतकऱ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. रुख्मीणा मधुकर उमाळे, रा. बेलुरा, ता.
शेगाव यांना ‘राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतिशील महिला शेतकरी सन्मान पुरस्कार’ व प्रितेश विजयराव डहाके, रा. डोणगाव, ता. मेहकर यांना
‘कै. वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दोघांनाही
रोख ११ हजार रुपयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी
मान्यवरांच्या हस्ते दिवंगत वसंतराव नाईक व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन
करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी प्रास्ताविक
करून दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्याची व कृषी विभागाच्या योजनांची माहिती
दिली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी तर आयोजन कृषी विभागाच्या चमूने केले. जिल्ह्यातील
अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला.
0000



Comments
Post a Comment