सहकार पुरस्कार; सहकारी संस्थांकडून 18 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

 

सहकार पुरस्कार; सहकारी संस्थांकडून 18 जुलैपर्यंत प्रस्ताव आमंत्रीत

बुलडाणा, (जिमाका) दि. 7:  राज्यातील सहकार चळवळीला बळकटी देणाऱ्या व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना महाराष्ट्र शासनामार्फत "सहकार पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील कामगिरीच्या आधारे या पुरस्कारासाठी पात्र संस्थांची निवड केली जाणार आहे. याबाबतचा कालबद्ध कार्यक्रम राज्य शासनाने नुकताच जाहीर केला आहे.

पुरस्कारासंदर्भातील सविस्तर माहिती सहकार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर http://sahakarayukta.maharashtra.gov.in तसेच जिल्हा उपनिबंधक व तालुका स्तरावरील सर्व सहायक निबंधक यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी केलेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह 18 जुलै 2025 पर्यंत संबंधित तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर करावेत. सहकारी क्षेत्रातील पारदर्शक व प्रेरणादायी कार्यास शासन पुरस्कृत स्वरूपात प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या